संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा नाही

प्रभात वृत्तसेवा

पुणे – ऐन पावसाळ्यात शहरात संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर पसरत असून डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू सारख्या साथींचे आजार वेगाने पसरण्याची भीती आहे. मात्र, त्यावर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

पुणेकरांना गाळमिश्रित पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या, तसेच साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणीही पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)