संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ

File Photo

बदललेल्या हवामानाचा प्रभाव : आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

पुणे – मागील पंधरा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येते. परंतु, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बदललेल्या हवामानामुळे मलेरिया आणि संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला, उलटी, जुलाब झाल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडून औषधोपचार घ्यावा, जेणेकरून संसर्ग वाढणार नाही, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.

-Ads-

शहरात दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत असल्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. गेल्या आठ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आला नाही. परंतु, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसून, संसर्गजन्य आजारही बळावू लागले आहेत. मागील तीन महिन्यांत दोनशेहून अधिक व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली आहे. तर संशयितांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी घरांमध्ये गुडनाईट लावावी, पूर्ण शरीर झाकलेले असे कपडे घालावे, डेंग्यूच्या डासाच्या पैदासीचे ठिकाण नष्ट करावे, गॅलरी किंवा टायरमध्ये पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. दरम्यान, स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही दररोज संशयीत व्यक्तींची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.29) दिवसभरात 3 हजार 627 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 व्यक्तींना स्वाईन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. तर 70 व्यक्ती संशयीत म्हणून आढळून आले. त्यांना टॅमीफ्लू देऊन घरी सोडण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)