संसद सदस्यांच्या भोजनावर दरसाल 15 कोटी अनुदान

आरटीआयची माहिती 

नवी दिल्ली – देशातील कोट्यधीश खासदारांच्या भोजनावर केंद्र सरकार दरवर्षी सुमारे 15 कोटी रुपयांचे अनुदान देत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. मध्य प्रदेशातील नेमच येथील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांना माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेली माहिती थक्क करणारी आहे. संसदेत कोट्यधीश खासदारांची संख्या फार मोठी आहे. खासदारांना दरमहा दीड लाख रुपये वेतन, भत्ते, मोफत निवास, वीज,मेडिकल. रेल्वे आणि विमानाने मोफत प्रवास अशा सुविधा मिळतात आणि एकदाच निवडून आले तरी आयुष्यभर पेन्शनही मिळते. आणि हे सारे असूनही त्यांच्या भोजनावर सरकार दरवर्षी सुमारे 15 कोटी रुपये अनुदान देते. संसदेतील चार कॅंटिन्समध्ये ही सवलत देण्यात येते.

चंद्रशेखर गौड यांना मिळालेल्या माहितीनुसार सन 2012-13 ते 2016-17 या काळात एकूण 73,85,62,474 रुपये अनुदान दिले गेले. सन 2012-13 मध्ये 12,52,01,867, 2013-14 मध्ये 14,09,69,082, 2014-15मध्ये 15,85,46,612, 2015-16 मध्ये 15,97,91,259 आणि सन 2016-17 मध्ये 15,40,53,654 रुपये अनुदान देण्यात आले.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांना एलपीजी मिळावा म्हणून सर्वसामान्य जनतेला गॅसवरील अनुदान सोडण्यावे आवाहन करतात. आणि दुसरीकडे कोट्यधीश असलेल्या आणि पासरीभर सवलती घेणाऱ्या आपल्या खासदारांव्या भोजनावर कोट्यवधी रुपयांचे अनुदान देतात ही मोठी विलक्षण बाब आहे. या खासदारांना दिलेल्या अनुदानाची वसुली सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैशातूनच केली जाते, तेव्हा पंतप्रधान या खासदाराना भोजनावरील अनुदान सोडण्याचे आवाहन करतील अशी अपेक्षा चंद्रशेखर गौड यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)