संसदेस कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या-पंतप्रधान

नवी दिल्ली – संसदेला कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना केले आहे. ऑडियो ब्रिजद्वारे खासदारांशी बोलताना पंतप्रधानांनी असे आवाहन केले आहे. काही राजकीय पक्षांनी संसद ओलीस धरून संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा अर्धा भाग काहीही कामकाज न होता वाया गेला त्या, संदर्भात पंतप्रधान आपल्या खासदांरांशी बोलत होते.

सन 2014 च्या निवडणुकीत ज्यांना सत्ता मिळू शकली नाही, असे घटक आपला अहंकार आणि निराशेपोटी संसदेचे कामकाज होण्यात अडथळे आणून राष्ट्राची प्रगती रोखू पाहत आहेत; सत्तेच्या लोभापायी ते लोकशाहीचा गळा घोटू पाहत आहेत ही गोष्ट लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन पंतप्रधानांना खासदारांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)