संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; महागाई वाढण्याचे संकेत

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. 2018-19 वर्षात विकास दर 7 ते 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचेल तसेच चालू वर्षात विकास दर 6.75 टक्के राहिल असे अहवालात म्हटले आहे. पुढच्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था वेग पकडेल असा अंदाजदेखील आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षापासून सुरु केलेल्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमामुळे यंदा जीडीपी 6.75 टक्क्यांपर्यंत पोहोचला. 2018-19 मध्ये हाच जीडीपी 7 ते 7.5 टक्के झालेला असेल असे जेटली म्हणाले. 2017-18 आर्थिक वर्षात ज्या सुधारणा हाती घेतल्या त्याचे चांगले निकाल 2018-19 मध्ये दिसतील असे सरकारचा दावा आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या दराविषयी चिंता व्यक्त करताना महागाई वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)