संसदेतील कोंडी सोडवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न

नवी दिल्ली – संसदेमध्ये विरोधक आणि सरकार दरम्यान निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी केंद्र सरकारने विरोधकांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे सरकारने ठरवले असून केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल हे या नेत्यांची भेट घेणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यापासून गेल्या 14 दिवसात संसदेचे कामकाज वेगवेगळ्या पक्षांच्या मागण्यांमुळे होऊ शकलेले नाही. सरकारविरोधात अविश्‍वास ठरावाबाबतही चर्चा करण्याची तयारी केंद्राने दर्शवली आहे. लोकसभेमध्ये सरकारला पूर्ण बहुमत आहे, असे गोयल यांनी सांगितले.

कॉंग्रेस, अद्रमुक, टीडीपी आणि टीआरएस आदी प्रमुख पक्षांच्या मागण्यांबाबत सामोपचार करण्यासाठी या पक्षांच्या नेत्यांची आपण भेट घेणार आहोत, असे गोयल यांनी सांगितले. संसदेमधील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटावर 2.5 लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे मुद्दे उपस्थित करावेत आणि चर्चाही करावी, असे आवाहनही गोयल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. “पीएनबी’ गैरव्यवहाराबाबत विरोधकांपेक्षा सरकारकडे सांगण्यासारखे बरेच आहे. केंद्र सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या प्रयत्नांबाबत प्रामाणिक आहे. चर्चा संसदेमध्ये होणे अपेक्षित आहे. विरोधक टिव्हीवर आणि अन्यत्र चर्चा करतात. मात्र संसदेत नाही. हे विचित्र आहे. काही विरोधक केवळ संसदेत गदारोळच करतात आणि संसदेचे कामकाज चालवणे हे सरकारचे काम आहे, असे म्हणत असल्याची टीकाही गोयल यांनी केली.

कामकाजात अविश्‍वासाची नोटीस मांडणेही सभापतींसाठी अवघड होत असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. तिहेरी तलाक, व्हिसलब्लोअर प्रोटेक्‍शन आणि ओबीसी आयोगासारख्या महत्वाच्या विधेयकांवर संसदेची मंजूरी मिळणे बाकी आहे. लोकसभेमध्ये महत्वाच्या वित्त विधेयकाला चर्चेविना मंजूरी मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)