संसदेतल्या श्रीमंत खासदारांनी पगार घेऊ नये- वरुण गांधी

नवी दिल्ली: देशातली आर्थिक विषमता कमी करण्यासाठी संसदेतल्या श्रीमंत खासदारांनी उरलेल्या लोकसभेच्या कार्यकाळातला आपला पगार घेऊ नये असे आवाहन भाजप खासदार वरुण गांधी यांनी केले आहे. यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्रही लिहिले आहे.

 

-Ads-

एक कोटींची संपत्ती असलेल्या खासदारांची संख्या 449च्या घरात आहे. त्यातील 10 कोटींहून अधिक संपत्ती असलेले 132 खासदार आहेत.सध्या देशातली सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढली आहे. अशावेळी समाजात चांगला संदेश जावा यासाठी कोट्यधीश खासदारांनी उर्वरीत काळातलं वेतन घेऊ नये असे वरुण गांधींनी सुचवले आहे.

सध्या लोकसभेत खासदारांची सरासरी संपत्ती 14.16 कोटी तर राज्यसभेतील खासदारांची सरासरी संपत्ती 20.12 कोटी आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी कोट्यधीश खासदारांना उर्वरीत कालावधीतील वेतन न घेण्याचे आवाहन करावे, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)