संसदेच्या 14 व्या दिवसाचे कामकाजही वाया

नवी दिल्ली – लोकसभेमध्ये अद्रमुक आणि टीआरएसच्या सदस्यांनी घातलेल्या गदारोळामुळे आज अधिवेशनाच्या 14 व्या दिवशीही कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. केंद्र सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठरावाच्या दोन नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र त्या दोन्ही नोटीसा गेल्या चार दिवसांमध्ये सभागृहामध्ये सभापती सुमित्रा महाजन मांडू शकल्या नाहीत. जोपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालत नाही, तोपर्यंत या नोटीसा मांडणे शक्‍य नसल्याचे त्यांनी सांगितले.
कावेरी जलवाटप व्यवस्थापन आणि कोटाच्या मुद्दयावरून अद्रमुक आणि टीआरएस या पाअंच्या नेत्यांनी गोंधळ घातल्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासामध्ये काहीही काम होऊ शकले नाही.

सभागृहाचे काम पुन्हा सुरू झाल्यावर सदस्यांनी पुन्हा गोंधळाला सुरूवात केली. याच वेळी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य अविश्‍वास ठरावाबाबत सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे आग्रह धरत होते. बॅंकिंग गैरव्यवहार आणि अविश्‍वासाच्या मुद्दयावर सभागृहामध्ये सरकार चर्चेस तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले.

सभापती महाजन यांनी अविश्‍वास ठरावाची नोटीस मांडण्याचा प्रयत्न केला मात्र अद्रमुकच्या सदस्यांनी अधिकच गोंधळ घातल्याने कामकाज तहकूब करावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)