संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून 

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून होणार आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीने मंगळवारी रात्री हिवाळी अधिवेशनाच्या वेळापत्रकाची शिफारस केली. त्यानुसार, सुमारे महिनाभर चालणारे अधिवेशन 8 जानेवारीला समाप्त होईल. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारचे ते अखेरचेच पूर्ण अधिवेशन ठरेल. त्या अधिवेशनात कामकाजाचे 20 दिवस मिळतील.

-Ads-

संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी त्याचा प्रारंभ डिसेंबरमध्यये होणार आहे. चालू वर्षी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे अधिवेशन लांबणीवर पडले आहे. भाजप आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय राजकारणातील दोन प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा विधानसभा निवडणुकांमध्ये पणाला लागली आहे. त्यामुळे त्या निवडणुकांच्या निकालाची गडद छाया अधिवेशनावर पडण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)