संसदेच्या इमारतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साफ-सफाई

संसद चकाचक
नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभेच्या पंधराव्या अधिवेशनात सहभागी होताना देशभरातील खासदारांना खास रोमांचक अनुभूतीचा आभास होत आहे. सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत संसदेची इमारत चकाचक केली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदेचे स्वरूप आधीपेक्षा खूप बदलले आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 88 वर्षे जुन्या संसदेच्या इमारतीची साफ-सफाई अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली आहे. यामुळे संसदेची इमारत पूर्णपणे चकाचक झाली आहे.

संसदेची इमारत लाल दगडाची आहे. धूळ, माती, धुंवा आणि खाण्यापिण्याच्या वस्तुंमुळे इमारत फार खराब झाली होती. काही ठिकाणचे लाल दगड काळ्या रंगाचे झाले होते. घाणीमुळे दगडातील बारीक-बारीक छिद्र बंद झाले होते. प्रदुषणातील सल्फर डाय ऑक्‍साईडमुळे दगडाची झिज होत होती.

-Ads-

अशात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेला चकाचक करण्याचे आदेश दिले. तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर संसद भवन, सेंट्रल हॉल आणि लोकसभेचा हॉल चकाचक करण्यात आला आहे. सफाई करताना वॉटर जेट, स्टीम जेट आणि मायक्रो सॅंड ब्लास्टिंगचा वापर करण्यात आला.

संसदेची इमारत एक ऐतिहासीक वास्तू आहे. यामुळे स्वच्छता करताना इमारतीचे काहीही नुकसान होणार नाही याची खास खबरदारी घेण्यात आली आहे. सीपीडब्ल्यूडी विभागाने साफ-सफाईचे काम हाती घेण्यापूर्वी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणजे इनटेकच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला.

साफ सफाई करताना केमीकलचा अजिबात वापर झालेला नाही. साबण बनविण्यासाठी उपयोगात येणारा अमोनिया आणि टिपोलचा वापर करण्यात आला आहे. घट्ट डाग काढण्यासाठी सॅंड मायक्रो ब्लास्टींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)