संसदीय समितीला चुकीची माहिती दिल्याबद्दल ब्रिटिश गृहमंत्र्यांचा राजीनामा

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या गृहमंत्री अँबर रड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संसदीय समितीला अनवधानाने चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान थेरेसा मे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याबद्दल आपल्या सरकारची कोणतीही योजना नाही, असे अँबर रड यांनी गेल्या आठवड्यात संसदीय समितीला सांगितले होते. या निवेदनानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला होता.

अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याबाबत मी संसदीय समितीला अनवधानाने चुकीची माहिती दिली. प्रत्यक्षात याबाबत माझ्याकडे अचूक माहिती असणे आवश्‍यक होते. माझ्या हातून घडलेल्या या चुकीचा मी स्वीकार करत आहे आणि त्यासाठी माझा राजीनामा सादर करीत आहे, असे त्यांनी पंतप्रधानांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अँबर रड यांचा राजीनामा म्हणजे थेरेसा मे सरकारवर झालेला एक मोठा आघातच आहे. ब्रिटनच्या आंतरिक मंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात राजीनामा सादर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)