संसदचे कामकाज ठप्प

राम मंदिर, राफेल मुद्‌द्‌यांवरून गदारोळ

नवी दिल्ली – राम मंदिर, राफेल करार घोटाळ्यासह अन्य प्रमुख मुद्‌द्‌यांवर चर्चा व्हावी, अशी जोरदार मागणी विरोधकांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली. यावरून गदारोळ झाल्यानंतर दोन्ही सभागृहांतील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राफेल करार, राम मंदिर आदी मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले. मात्र कॉंग्रेस, टीडीपी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी पुन्हा गदारोळ करत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली.दुसरीकडे राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच गदारोळामुळे काही मिनिटांतच स्थगित करावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)