संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया : डॉ. गिरीश जाखोटिया

कराड – संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे चिकित्सक दृष्टी व सूक्ष्म निरीक्षण क्षमता असेल तर वैज्ञानिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करता येते. विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्‍न पडले पाहिजेत. त्यासाठी शिक्षकांची मदत घेतली पाहिजे. तरच हे विद्यार्थी भावी संशोधक बनतील, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. गिरीश जखोटिया यांनी व्यक्‍त केले.

येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीष गोडबोले, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, सचिव अनिल कुलकर्णी, शैक्षणिक प्रकल्प प्रमुख रमेश फडसळकर डॉ. प्रकाश सप्रे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरीष गोडबोले म्हणाले, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि गुणवत्तेचा ध्यास घेतला पाहिजे. संस्था नेहमीच अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व सहकार्य करत असते. या सुसज्ज प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार आहे.
विज्ञान विभागप्रमुख सोनाली जोशी व पर्यवेक्षक विजय कुणकर्णी यांचे प्रयोगशाळा उभारणीत महत्त्वाचे योगदान असल्याने त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जगदीश सुभेदार, हिंदुराव डुबल, मोहन सर्वगौड, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. प्रशांत शेवाळे, शरयू माटे, विद्या घोलप उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)