संशोधन, तंत्रज्ञानातूनच देश विकासाला गती : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी 


सीओईपीसह देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद


 हॅकेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे – “नावीन्यता, पेटंट, प्रोडक्‍ट, समुद्धी’ या चतु:सूत्रीवर भर देण्याची गरज आहे. नावीन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाचा विकासाच्या गती मिळू शकतो, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्‍त केला. त्यांनी देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. देशभरातून हॅकेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांशी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाच्या केंद्रातून विद्यार्थ्यांनी मोदी यांचे विचार ऐकले. तांत्रिक अडचणीमुळे पुण्यातील विद्यार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधता आला नाही.

नरेंद्र मोदी म्हणाले, शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे सोल्यूशन शोधण्याचे काम आपण करत आहात. आपल्या देशातील 65 टक्के लोकसंख्या 35 पेक्षा कमी वयाची आहे, त्यामुळे कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्‍य नाही. त्याद्वारे 21 व्या शतकात आपण भारताला चांगल्या स्थानी पोहचवू शकू. गेल्या चार वर्षात पेटंट नोंदणीच्या संख्येत तीनपटीने वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांमध्ये लहान वयात शोधकवृत्ती निर्माण व्हावी, यासाठी देशातील अनेक शाळांमध्ये “अटल ट्रिकरिंग लॅब’ सुरू केल्या जात आहेत. बी.टेक., एम.टेक.मध्ये चांगले संशोधन व्हावे, यासाठी देशभरातून एक हजार विद्यार्थ्यांना पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे महिना 70 ते 80 हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जाईल. उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.

लोकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी संशोधन महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी सांगितले. प्रकाश जावडेकर म्हणाले, देशातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून 1 लाख विद्यार्थी यावर काम करत आहे. यातून तरूण संशोधकांची एक मोठी टीम तयार झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)