संशोधन “कॉपी-पेस्ट’ करणारे प्राध्यापक अडचणीत

400 जणांना नोटीस : तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेश

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या चार वर्षांत प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालातून अनेक संशोधनात साधर्म्य आढळून आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठाने 400 प्राध्यापकांना नोटीस पाठविली असून, याप्रकरणी संबंधित प्राध्यापकांना खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऑनलाइनवरून संशोधन “कॉपी-पेस्ट’चा प्रयत्न करणारे प्राध्यापक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) संशोधनासाठी प्राध्यापकांना मोठ्या प्रमाणात निधी विद्यापीठांना दिले जाते. त्याद्वारे पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रोत्साहित करण्यासाठी संशोधन प्रकल्प अहवाल अर्थात “रिसर्च प्रोजेक्‍ट रिपोर्ट’ योजना राबविली. त्यानुसा प्राध्यापकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांना निधी मंजूर करण्यात आला. मात्र, योजनेअंतर्गत संशोधन करून विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालामध्ये अन्य संशोधकांच्या संशोधनातील मजकुराची उचलेगिरी केल्याचे आढळून आले आहे.

समितीने केला संशोधनातील चोरीचा उलगडा
पुणे विद्यापीठाने संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी व त्याबाबत उपायोजना करण्यासाठी 17 तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने गेल्या चार वर्षांत प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालाची पडताळणी केली. त्यात 4 हजार संशोधन प्रकल्पाची संगणक प्रणालीद्वारे तपासणी केली. त्यात 10 टक्‍के अर्थात 400 प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्प अहवालात इतर संशोधनाचे सामर्ध्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राध्यापकांच्या खुलाशानंतर पुढील कारवाई
यासंदर्भात कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, संशोधनात्मक प्रकल्प पुढे यावेत आणि खऱ्या संशोधनाला न्याय मिळावा, या उद्देशाने विद्यापीठाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने संशोधन प्रकल्पाची तपासणीनंतर हा प्रकार पुढे आला आहे. त्यात प्रत्यक्षदर्शी अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याबाबत 400 प्राध्यापकांना खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे. मात्र तत्कालीन कालावधीचा विचार करून योग्य संशोधन प्रकल्पांना न्याय देण्याची विद्यापीठाची भूमिका राहणार आहे. मात्र, त्यावरून सर्वच संशोधन प्रकल्पात त्रुटी आहे, असे म्हणणे अतिशोयोक्‍ती ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)