संशोधक बनण्यासाठी जिज्ञासा आवश्‍यक – प्रा. दिगंबर दुर्गाडे

वाल्हे- विज्ञानातून अनेक शोध लागतात; परंतु शोध कसा लागतो? हा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला पाहिजे आणि जेव्हा हा प्रश्‍न पडेल तेव्हा विद्यार्थी संशोधक बनतील, असे मत रयत शिक्षक संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय 44व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन रयत शिक्षण समितीचे समन्वयक प्रा. दिगंबर दुर्गाडे व पश्‍चिम विभागाचे सदस्य किसन रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद शहा, नंदकुमार सागर, सुरेश लांघी, शिक्षक समितीचे सचिव रामदास शिंदे, किरण कुमठेकर, हनुुमंत पवार, वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले आदी उपस्थित होते.
दुर्गाडे म्हणाले की, विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तर शोधल्यास आपण विज्ञानाची कास धरू शकतो. मात्र, प्रश्‍नच नाही पडल्यास सर्वच बाजूने अधोगती होईल. त्यासाठी प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी जिज्ञासा आवश्‍यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र डोंगरे यांनी केले. तर प्राचार्य चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)