संशयास्पद फिरणारे सात जण पोलिसांच्या ताब्यात

श्रीगोंदा – गुरुवारी मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरणाऱ्या सात जणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सात जण वाळूतस्करांचे खबरे असल्याचे समजते. वाळूतस्कर रात्री नदीपात्रातून वाळूउपसा करतात. आपल्या दिशेने महसूल किंवा पोलीस खात्याचे लोक कारवाई करण्यासाठी येतात का यासाठी त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी वाळूतस्करांनी पंटर नेमले आहेत.

हे पंटर रात्री आणि दिवसा महसूल, पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्याचेकाम करतात. त्यामुळे कारवाईला जाणारे पथक सदर ठिकाणी पोहोचण्याआधीच वाळूतस्करांना याबाबत या पंटरांमार्फत टीप पोहोचते.

अशा रात्री पहारा ठेवणाऱ्या लोकांवरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, चालक औटी, पोलीस शिपाईसंभाजी वाबळेरात्री गस्त घालत असताना शेडगावफाटा येथे तीन इसम संशयास्पदरितीने फिरताना त्यांना दिसले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता काही ब्लेड आणि चावीचा जुडगा आढळून आला. यानंतर पेडगाव येथे दोन इसम असेच संशयास्पद रित्या आढळले. त्यांना नाव विचारले असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर त्यांची झडती घेतली असता त्यातील एकजनाकडे स्क्रू ड्रायव्हर, ब्लेड असे साहित्य आढळून आले.

दबाव झुगारुन कारवाई…

रात्री वाळूपंटरांना पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी काही बड्या राजकीय लोकांनी पोलीस ठाण्यात फोन केला. या लोकांना सोडण्यासाठी दबाव टाकल्याचे समजते. तरीदेखील पोलिसांनी दबाव झुगारून कारवाईकेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)