संशयाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पिंपरी – पतीच्या संशयी वृत्तीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून 33 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) घडली. आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मोबाईलमध्ये तिला होणाऱ्या त्रासाची सर्व माहिती सांगितली आहे.

पवित्रा पद्मराज ढुंगाणा (वय-33, रा. क्रांतीनगर, आकुर्डी. मूळ नेपाळ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पवित्रा या त्यांचा पती पद्मराज यांच्यासह गेल्या काही वर्षापासून आकुर्डी येथे रहात होत्या. पद्मराज हा एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता तर पवित्रा ही धुणी भांडी करत होती. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

सोमवारी पद्मराज हा कामावर गेला होता तर मुले शाळेत गेली असताना पवित्रा यांनी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. पती व त्याचा एक मित्र तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता तसेच तिला दारु पिण्यासाठी बळजबरी करत होता, असे पवित्राने आत्महत्येपूर्वी केलेल्या मोबाईल रेकॉर्डींगमध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)