संविधान हा गोरगरिबांचा आवाज : ऍड. भोसले

म्हसवड – संविधानामुळे देशातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र नांदत आहेत. उपेक्षितांना न्याय देण्याचे काम करणारे भारतीय संविधान गोरगरिबांचा आवाज बनले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक ऍड. राजू भोसले यांनी केले.

सातारा येथे राष्ट्रवादी भवनात सामाजिक न्याय विभाग जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व संविधान सन्मान दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर कांबळे, उपाध्यक्ष अनंता वाघमारे, सचिन गायकवाड, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण बोभाटे, फलटण तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मोरे, सातारा तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, उपाध्यक्ष समाधान कांबळे, कराड शहर अध्यक्ष प्रशांत शिंदे उपस्थित होते.

-Ads-

यावेळी ऍड. राजू भोसले व सागर कांबळे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सागर कांबळे, अनंता वाघमारे, सचिन गायकवाड, प्रवीण बोभाटे, भाऊसाहेब मोरे, सुरेश सावंत, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगत करत खा. शरद पवार यांचे विचार घराघरात पोहचवण्याचे आवाहन केले. संविधान प्रस्तावनेचे सार्वजनिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आभार भाऊसाहेब मोरे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)