संविधान दिन कार्यक्रमाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन 

नवी दिल्ली – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमाचे आज नवी दिल्लीत उद्‌घाटन केले. संविधान हा स्वतंत्र भारताचा आधुनिक दस्तावेज आहे. याचे स्थान सर्वोच्च आहे. संविधान म्हणजे केवळ कलमं आणि नियम, उपनियमांचा संग्रह नव्हे तर सर्व भारतीयांसाठी हा स्फूर्तीदायी दस्तावेज आहे.

समाजासाठी हा एक आदर्श आहे असे राष्ट्रपती म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान परिषदेचे त्यांचे सहकारी यांनी घटना दुरुस्तीबाबत लवचिकता प्रदान केली. संविधान नागरिकांचे सबलीकरण करते त्याचबरोबर नागरिकही संविधानाचे पालन, जतन आणि रक्षण करुन आपले शब्द आणि कार्याद्वारे त्याला अधिक अर्थ प्राप्त करुन देते असे राष्ट्रपती म्हणाले.

-Ads-

सामाजिक न्याय या संकल्पनेचा विस्तार करुन स्वच्छ हवा, कमी प्रदूषित शहरं, नद्या, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवन, हरीत आणि पर्यावरणस्नेही विकास यासारख्या आधुनिक नागरी मापदंडांचा समावेश यात झाला आहे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानामुळे लाभ झाला आहे. मात्र, त्यामुळे खासगीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाविन्यतेमुळे समाजातल्या वंचितांना लाभ झाला आहे. तंत्रज्ञानावर आधारित “आधार’शी जोडल्या गेलेल्या थेट लाभ हस्तांतरणामुळे भ्रष्टाचार आणि गळतीलाही आळा बसल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)