संविधान जाळण्याच्या घटनेचा साताऱ्यात निषेध

सातारा,दि.11 प्रतिनिधी- दिल्ली येथे जंतर मंतर परिसरात संविधान जाळण्याच्या घटनेचा शनिवारी साताऱ्यात निषेध करण्यात आला. रिपाइंसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत संविधान जाळणाऱ्यांचा निषेध करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी केली.
संविधानामुळे भारतात स्वातंत्र्य, लोकशाही, समता, न्याय, बंधुता निर्माण झालेली असताना काही देशद्रोह्यांनी निषेधार्ह कृत्य केले आहे. त्यांना सरकारने तात्काळ अटक करून त्यांच्याव देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा. सरकारने आमच्या मागण्यांची गांभिर्याने दखल घेवून पाऊले उचलली नाही तर नागरिकांमध्ये उद्रेक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दादासाहेब ओव्हाळ, नवनाथ शिंदे, फारूक पटणी, आयेशा पटणी, साईनाथ खंडागळे, बाळासाहेब जाधव, राजाभाऊ माने, विक्रम वाघमारे, बाबा ओव्हाळ, पिंटु गायकवाड, संतोष ओव्हाळ यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)