संविधान जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : प्रा.कविता म्हेत्रे

वडूज : पोलिसांना निवेदन देताना प्रा. कविता म्हेत्रे व महिला आघाडी पदाधिकारी. (छाया : नितीन राऊत)

वडूज, दि. 17 (प्रतिनिधी) – जंतर मंतर दिल्ली येथे समाजकंटकांनी भारताच्या संविधानाची प्रत जाळली आहे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जातीय आकसापोटी आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देत ही निंदनीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे व राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टी महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रमिला पाटोळे, जिल्हा चिटणीस आयेशा मुलाणी, तालुकाध्यक्ष आशाताई बरकडे, शहराध्यक्ष शबाना मुल्ला, तालुकाउपाध्यक्षा शारदा भस्मे, कार्याध्यक्षा पुष्पा चव्हाण, रोहिणी जाधव, आरती पाटोळे, कांचन नलवडे, आस्मा मुलाणी, सोनाली लावंड, जयश्री जगताप आदी राष्ट्रवादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
याबाबत वडूज पोलिसांत दिलेल्या निवेदनातील माहिती नुसार समाजकंटकांनी ही कृत्ये करून त्यांचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले आहेत. ही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. समाजविघातक मानसिकतेमुळे सामाजात तेढ निर्माण होण्याची शक्‍यता आहे.ह्या निंदनीय कृत्याबद्दल समाजकंटकांवर गुन्हे दाखल करुन कडक शासन करावे असे निवेदनात म्हणटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)