संविधानासमोर समाज व्यवस्थेचे मोठे आव्हान – प्रा. वारे

पिंपरी – धर्माच्या व जातीच्या आधारावर येथील व्यवस्थेचा डोलारा उभा राहिला असून संविधानासमोर हे मोठे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी आज बुधवारी (दि. 28) येथे व्यक्त केले.

येथील पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समितीच्या वतीने आयोजित भारतीय संविधान जनजागरण अभियानाच्या सातव्या सत्रामध्ये भारतीय संविधानसमोरील आव्हान या विषयावर ते बोलत होते. सांगवीतील निळू फुले नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज अभियानचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे होते. कार्यक्रमात प्रा. राजाभाऊ भैलुमे, शरद जाधव, विजय कांबळे, प्रभाकर ओव्हाळ, विजय जगताप आदी उपस्थित होते.

प्रा. वारे पुढे म्हणाले की, संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी करताना सर्व जाती धर्माच्या स्त्री, पुरूषांना सन्मानाची हमी व विकासाची संधी दिली गेलेली नाही. त्यामुळे भारतातील गरिबांची अधिकाधिक संख्या वाढली व ते उपेक्षित राहण्याचे कारण यामध्ये दडलेले आहे. शिवाजी महाराजांच्या रयतेचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता व शक्ती संविधानात आहे. मात्र कर्मठ व धार्मिक किनार लाभल्यामुळे हे शक्‍य होताना दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले. विशिष्ट जातींच्या किंवा विशिष्ट कुटुंबासाठी आरक्षण नसून तर ते समानतेसाठी आवश्‍यक आहे यासाठी गणती समानता नाही तर जैविक समानता संविधान मान्य करते, असा दाखला त्यांनी यावेळी दिला.

मानव कांबळे म्हणाले की, संविधानाची चौकट कायम ठेऊन घटना बदलण्याचे षडयंत्र आपण ऐकेत होतो. परंतु, आता तर उघड उघड चौकटच मूळासकट काढून टाकण्याचा कार्यक्रम राज्यकर्त्यांनी हाती घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रास्ताविक प्रा. ज्ञानदेव रणसूर यांनी केले. तर, विष्णु मांजरे यांनी स्वागत केले. दीपक गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)