संविधानामुळेच आपण सुरक्षित

गटविकास अधिकारी अस्वार : राजगुरूनगरात 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

राजगुरूनगर- आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. सर्व जाती धर्माचे लोक देशात सुरक्षित आणि आनंदाने राहतात ते केवळ संविधानामुळे. काही समाजकंटकांची मजल संविधानाच्या प्रती जाळण्यापर्यंत मजल गेली आहे. भविष्यातही देशाला संविधानाची गरज असून ते सुरक्षित राहिले पाहिज. एकमेकांना सन्मानाची वागणूक देत आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र सर्वांनी समजून घेणे काळजी गरज आहे, असे मत खेडच्य गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी केले.
राजगुरूनगर येथे जाणीव जागृती मंच व खेड पंचायत समिती यांच्यावतीने संविधानदिन साजरा करण्यात आला. यावेळी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधनाचे पूजन गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खेड पंचायतीच्या सभापती सुभद्रा शिंदे, बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश कानडे, निवृत्त जिल्हा उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, पी. टी. शिंदे, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. महादेव घुले, जाणीव जागृती मंचचे अध्यक्ष विठ्ठल भोर, व्ही. जी. मांजरे, अनिल राक्षे, के. एस. सांडभोर, मुरलीधर थिगळे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे, अधीक्षक चंद्रिका तळपे यांच्यासह खेड पंचायत समितीच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी जाणीव जागृती मंचचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. महादेव घुले यांनी संविधानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल भोर यांनी केले. हरिश्‍चंद्र थिगळे संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले. सूत्रसंचालन बाळासाहेब गारगोटे तर पी. टी. शिंदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)