संविधानामध्ये सर्व धर्म समभाव तत्वप्रणाली स्वीकृत केली

अॅड. भास्करराव आव्हाड 


डॉ. अॅड. बी. जी. मिडगे यांचा पुरस्कार देऊन गौरव

पुणे- भारतीय संविधानामध्ये सेक्‍युलर समाज व जाती अंताची प्रावधान हे वेदांत तत्वज्ञानातील सांस्कृतीक संस्कृती व विचार आहेत. म्हणूनच भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव ही तत्वप्रणाली स्वीकृत केली असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.

डॉ. अॅड. बी. जी. मिडगे यांचे नुकतेच “भारतीय संविधान व वेदांत तत्वज्ञान’ या विषयासाठी नुकतेच जागतिक परिषदेत “डॉक्‍टरेट इन लॉज’ या संशोधनासाठी गौरविण्यात आले. त्यांना आंतरराष्ट्रीय नामांकीत श्रीलंका व यु.एस.एस.आर. संलग्न युनोस्को या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे “डॉक्‍टरेट इन लॉज’ प्रदान करण्यात आले. संविधान परिवार या संस्थेमार्फत या निमित्त डॉ. मिडगे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. “वेदांतिक थिएरी ऑफ कॉन्स्टीट्यूशनल इंजिनिअरींग’ या विषयाची मांडणी डॉ. मिडगे यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे मा. अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते डॉ. मिडगे यांचा सत्कार करण्यात आला.

अॅड. आव्हाड पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती व तत्वज्ञानाचा मोठा परिणाम मूलभूत मानवी मूल्यांमध्ये असल्याचे दिसून येते. वेदांत काळातील मानवी मूल्यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे भारतीय संविधानाच्या मूल्यांमध्ये भारतीय संस्कृती व वेदांत तत्वज्ञान यांचा समावेश घटनाकारांनी केला आहे.

यावेळी मिडगे म्हणाले, भारतीय तत्वज्ञान संस्कृती व तिचा वारसा हा वेदांत तत्वज्ञानावर आधारित असल्याने ठामपणे मांडला. वेदांत तत्वज्ञान हे मानव धर्मावर आधारित आहे. जाती अंत व मानव धर्म ही वेदांत तत्वज्ञानातील मूल्ये भारतीय संविधानामध्ये स्विकारण्यात आलेली आहेत. यामुळे या संशोधनासाठी श्रीलंका स्थित आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने विचारांचा गौरव करून अतिच्च पदवी देऊन गौरविले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधिश एम. एस. कोल्हे होते. तसेच, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, राष्ट्रीय हरीद लवाद बारचे अध्यक्ष अॅड.सौरभ कुलकर्णी, उपाध्यक्ष अॅड. असीम सरोदे, लेबर लॉ प्रॅक्‍टीशनर असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. दर्शना सावंत यांचा सत्कार करण्यात आला. आभार एस. एम. जोशी फाउंडेशनचे विश्‍वस्त अॅड. संतोष म्हस्के यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)