भुईंज, दि. 2 (वार्ताहर) – सध्याचा युवा वर्ग टीव्ही मालिका आणि मोबाईलच्या आहारी गेला आहे. ही परिस्थिती भयावह असून युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी लिहिलेली घटना आणि संविधानाचा विसर पडू नये यासाठी बार्टी पुणे मार्फत वाई तालुक्यात संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या समता दूत मालन गिरीगोसावी यांनी दिली.
वाई तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि पोलिस ठाण्यात पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अंतर्गत संविधान सप्ताह जागर अभियानाचे आयोजन संस्थेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली करुन संस्थेच्या खंडाळा तालुक्याच्या समता दूत मालन गिरीगोसावी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय घटनेची आणि संविधानाचा विसर पडू नये या विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी गिरीगोसावी यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती आणि संविधानाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा