संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

पुणे – दिल्लीमध्ये जंतर-मंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना कडक शासन करावे, या मागणीसाठी मांतग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, संजय साठे, रोहित अवचिले, धनंजय देडे, सुरेखा खंडाळे, अरूण गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी भारतीय संविधानाची प्रत जाळून आरक्षण हटाव, आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपींवर सरकारने अद्यापही कारवाई केलेली नाही.

-Ads-

त्यामुळे संविधानाचे आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्‍तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना कडक शासन करावे, अशा मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यामार्फत केंद्र आणि राज्य सरकारला पाठविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)