संविदणे दरोड्यातील सात आरोपींवर मोक्का

शिरूर -शिरूर पोलिसांनी सात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) या कायद्याखाली कारवाई केली असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संविदणे येथे लाकडी दांडके, लोखंडी गज कुऱ्हाड यांचा धाक दाखवून दरोडा टाकून लूटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रमेश नरसिंग भोसले (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), रामदास उर्फ चिवड्या उर्फ शिवा गोपाळ काळे (रा. निघोज), पप्पु आलम काळे (रा. निघोज), राघेश उर्फ राघ्या संजय काळे (रा. गुणोरे, ता. पारनेर), राहुल अर्पण भोसले, बाळु झारु भोसले, गिरीश आलम काळे (रा. निघोज) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी रामदास उर्फ चिवड्या उर्फ शिवा गोपाळ काळे, पप्पु आलम काळे, राघेश उर्फ राघ्या संजय काळे, गिरीश आलम काळे यांना अटक केली होती. शिरूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई होण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत पडताळणी झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्का अंतर्गत वाढीव कलम लावण्यास मंजुरी दिली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी करुन गुन्ह्यतील अटक व फरारी आरोपींविरुद्ध मोक्का कोर्टात दोषारोपपत्र पाठविणेकरिता अप्पर पोलीस महासंचालक यांची पूर्वपरवानगी प्राप्त केली. हा गुन्हा या आरोपींनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र मोक्का कोर्टात दाखल केले. यापुढेही शिरूर पोलिसांकडून संघटित गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करुन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)