संवत्सरच्या ग्रामसभेला अवघे तीनच सदस्य हजर

ग्रामस्थांकडून नाराजी : पंचायतराज दिवसाचे सदस्यांना देणेघेणे नसल्याबाबत खंत
कोपरगाव – तालुक्‍यातील आदर्श गाव असलेल्या संवत्सर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंचायतराज दिनाचे तसेच ग्रामसभेचे गांभीर्य नसल्याचे नुकतेच उघड झाले. सतरा पैकी अवघे तीनच सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहिले. त्याबद्दल ग्रामस्थ व संजीवनी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्‍वर भगवंता परजणे यांनी आक्षेप नोंदविला आहे. ग्रामसेवक अहिरेंनीदेखील गावच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर काहीही माहिती न देता दुसऱ्याच विषयावर सभा भरकटवली, असा आरोप त्यांनी केला.
ज्ञानेश्‍वर परजणे यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस. त्याचे विशेष महत्त्व आहे. मात्र संवत्सर ग्रामपंचायतीने त्यास हरताळ फासला. या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर गावात ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यास 17 पैकी अवघे तीनच सदस्य उपस्थित राहिले. कोरमदेखील पूर्ण झाला नाही. तेव्हा याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस काढून त्याबाबतची विचारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. शासनांच्या तसेच ग्रामपंचायतस्तरावर असणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामसभेतून नागरिकांना दिली जाते. पण पंचायत राजदिनाला याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही. समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामसभेला विशेष अधिकार देवून त्याबाबत मोठी जनजागृती केली.
संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्यांनी या घटनेस हरताळ फासला आहे. त्यांना या ग्रामसभेचे काही एक घेणे देणे नाही. संवत्सरसारख्या आदर्श गावात पंचायत राज दिनाची अशा पद्धतीने खिल्ली उडविली जाते, हे दुर्भाग्य आहे. ग्रामसभेत भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ, कासार संजीवनी बॅंकेचे संचालक राजाभाऊ परजणे, प्रवीण भोसले आदींनी गावपातळीवरील सामाजिक योजनांची माहिती व संवत्सर ग्रामपंचायतीने त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत विचारणा केली. ग्रामसेवक अहिरे यांना त्याविषयी उत्तरे देता आली नाहीत. तेव्हा वरिष्ठ पातळीवर झाल्या प्रकाराची दखल घेवून संबंधीत बेजबाबदार संवत्सर ग्रामपंचायत सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी नोटीसा काढून ग्रामसभेबाबत स्पष्टीकरण मागवावे, अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)