संरक्षण मंत्र्यांसोबतची ‘ती’ मुलगी सैन्याधिकारी

सोशल मीडियावर निर्मला सीतारामन यांची मुलगी असल्याचा दावा


संरक्षण मंत्रालयाकडून दावा चुकीचा असल्याचा खुलासा

पुणे – संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका मुलीसोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सैन्याधिकाऱ्याचा गणवेश घातलेली ती मुलगी सीतारामन यांचीच मुलगी असल्याचा दावा यात केला जात होता. मात्र, हा दावा चुकीचा असल्याचे सांगत ती मुलगी सीतारामन यांची नसून सैन्य दलातील एक अधिकारी असल्याचा खुलासा संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच एका भेटीदरम्यान एका महिला अधिकारीसोबत फोटो काढला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला. तसेच ती महिला अधिकारी ही सीतारामन यांचीच मुलगी असल्याचा दावा नेटीझन्सकडून केला जात होता. यासाठी सीतारामन यांच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. हा सगळा प्रकार पाहता संरक्षण मंत्रालयाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. तसेच मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या प्रकाराबाबत खुलासादेखील करण्यात आला.

मंत्रालयानुसार, “फोटोमधील मुलगी ही सीतारामन यांची मुलगी नसून, सैन्य दलातील लायसनिंग ऑफिसर या पदावर कार्यरत असलेली सेनाधिकारी आहे. सीतारामन यांच्या भेटीदरम्यान हा फोटो घेण्यात आला आहे. त्यामुळे इतर अफवांवर विश्‍वास ठेवू नये.’ दरम्यान, या फोटोमागील सत्यता समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील “फेक न्युज’ हा प्रकार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)