संरक्षण मंत्र्यांना मारण्याचे चॅटिंग – उत्तराखंडात दोघांना अटक

पिथोरगढ (उत्तराखंड) – संरक्षण मंत्र्यांना मारण्याबाबत चॅटिंग करण्यावरून पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना ठार करण्याच्या कटाबाबत हे दोघे व्हाट्‌स ऍपवर चॅटिंग करत होते. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन उत्तराखंडच्या पिथोरगढ जिल्ह्यातील धारचूला दौऱ्यावर आहेत.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता पोलीसांना निर्मला सीतारामन यांना मारण्याच्या कटाबद्दल मेसेजची माहिती देण्यात आली. “” मैं सीतारामन को शूट करूंगा. कल उसका आखरी दिन होगा” असा संदेश एकाने दुसऱ्याला पाठवला होता. सोमवारी सकाळी चॅटिंग करणाऱ्या दोघांना अटक केल्यानंतर ते मद्याच्या नशेत असल्याचे पोलीसांना आढळून आले.

आयपीसी आणि आयटी ऍक्‍ट खाली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्याचे पिथोरगढचे पोलीस अधीक्षक रामचंद्र राजगुरू यांनी सांगितले. निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त लष्कराने आयोजित केलेल्या एका वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी धारचूला येथे आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)