संरक्षण क्षेत्रातील एफडीआयमध्ये मोदी सरकारला अपयश

नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील एफडीआय (फॉरेन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट-थेट परदेशी गुंतवणूक) बाबतीत मोदी सरकारला अपयश आल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षात संरक्षण क्षेत्रात फारशी थेट परदेशी गुंतवणूक झाल्याचे आढळून आलेले नाही. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मागील चार वर्षात संरक्षण क्षेत्रामध्ये केवळ 1.17 कोटी रुपयांचीच थेट गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मोदी सरकारने फॉरेन इन्व्हेस्टमेट बोर्डदेखील बंद करून टाकलेले आहे.

एप्रिल 2014 ते डिसेंबर 2017 या काळात संरक्षण क्षेत्रात केवळ 0.18 दशलक्ष डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी बुधवारी दिली आहे.

भारताने 1.25 लाख कोटीच्या संरक्षण खरदीसाठी 70 सौद्यंना मंजुरी दिलेली आहे. यामध्ये इस्रायलकडून राडार आणि क्षोणास्त्रे, अमेरिकेकडून विमाने, तोफा, फ्रान्सकडून लढाऊ विमाने, रशियाकडून रॉकेट्‌स आदीचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)