संरक्षणासाठी…हेल्मेट सक्ती योग्यच!

– गणेश राख  

पुणे – नववर्षाच्या सुरूवातीपासून शहरात हेल्मेटसक्ती होणार असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. शहर पोलिसांकडून नुकतीच यासंबंधीची घोषणा करण्यात आली असून यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.

-Ads-

गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या अपघातांची संख्या पाहता स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटसक्ती महत्त्वाची असून त्याचा वापर आवश्‍यक आहे. अपघातांमध्ये डोक्‍याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून हेल्मेट असते, तर यातील काही जीव वाचू शकले असते, अशी म्हणण्याची वेळ येते. यामुळे होऊ घातलेली हेल्मेटसक्ती नागरिकांच्या हिताचीच आहे.

दि.1 जानेवारीपासून हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आजवर सोशल मीडिया, प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन हेल्मेटचे महत्त्व सांगण्यात आले असून यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. दुचाकीवरील अपघातांमध्ये हेल्मेटमुळे डोक्‍याला होणारी संभाव्य इजा गंभीर होत नाही. अर्थात मोठ्या अपघातांमध्ये काही वेळा त्याचाही उपयोग होत नाही. मात्र, किरकोळ अपघातांमध्ये सुरक्षेची हमी मिळते. हेल्मेटला विरोध आणि हेल्मेट न वापरणे ही एक स्टाइल होत असून हेल्मेटसक्ती का करावी लागली? हे जाणून घेणे गरजेचे आहे. आज दुचाकीवरुन ये जा करताना होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. अशा प्रकारच्या अपघातांत डोक्‍याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे दिसून येते. यासाठी शहरात होत असलेल्या हेल्मेटसक्तीला विरोध न करता सर्वांनी स्वःसंरक्षणासाठी हेल्मेट वापरण्याची गरज आहे. तसेच, याबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती केली जात असून त्यामध्ये सामिल होऊन स्वतःहून जनजागृती करण्याची गरज आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करणे महत्त्वाचे असून यामुळे फायदाच आहे. अनेकदा दुचाकीवरुन होणारा अपघात किरकोळ असला तरी डोक्‍याला मार लागतो. अशावेळी लोकांना हेल्मेटचे महत्त्व समजते. मात्र, प्रत्यक्षात वापराचे प्रमाण अल्प असल्याने असे प्रकार घडतात. यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हेल्मेटसक्ती गरजेची आहे.
– नीलेश ढेकळे, दुचाकीस्वार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)