संरक्षक जाळ्याच झाले झाडांचे दु:ख!

पिंपरी – जेव्हा संरक्षकच आपल्या दु:खाचे कारण बनतो तेव्हा ते दु:ख कोणाला सांगावे अशीच अवस्था पिंपरी-चिंचवड शहरातील झाडांची झाली आहे. रोपांच्या सुरक्षेसाठी बसवलेली संरक्षण जाळी झाडे मोठी झाल्यावर काढली जात नसल्याने झाडांच्या खोडांमध्ये जाळी शिरल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत दरवर्षी लाखो रुपये खर्चून पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण केले जाते. रोपांच्या संरक्षणासाठी लाखो रुपये खर्चून लोखंडी जाळ्या बसवल्या जातात. रोपांची ठराविक वाढ झाल्यानंतर या जाळ्या काढणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरातील शेकडो झाडे लोखंडी जाळ्यांना आपल्या खोडात सामावून घेत वाढत आहेत. पदपथावर लावलेली झाडे त्यांना वाढण्याकरीता सभोवताली काही जागा सोडणे गरजेचे असते मात्र बऱ्याच झाडांना मुळ्या पसरण्याकरीता जागा नाही. त्यामुळे त्यांची वाढ खुंटत आहे. त्यांचा श्‍वास कोंडत आहे.

खराळवाडी परिसर निगडी ते नाशिक फाटा या रस्त्यावर झाडांचे खोड लोखंडी संरक्षण जाळ्यात शिरल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी झाडांना सर्रास जाहिरातीचे फलक लावण्याकरीता खिळे ठोकण्यात येत आहेत. आंघोळीची गोळीसह अन्य काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत शहरातील काही भागात खिळे मुक्त झाडे हे अभियान राबवले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत झाडांना खिळेमुक्त केले. याच धर्तीवर जाळीमुक्त झाडे करण्याची गरज झाली आहे. मात्र, या जाळ्या खोडात खोलवर रुतल्याने त्या काढणे आव्हान ठरणार आहे. या जाळ्यांमुळे झाडांच्या वाढीवर तसेच त्यांच्या बहरावर परिणाम होत असून या जाळ्या काढण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)