संरक्षक कठड्यावरच राम राम

यवतेश्‍वर घाटातील परिस्थिती “जैसे थे’च, संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
सातारा -जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या पर्यटन स्थळामध्ये सातारा जिल्ह्यातील “कास’चा आवर्जून उल्लेख होतो. सध्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे या ठिकाणाकडे पर्यटकांचा ओढा वाढणार आहे. परंतु, पर्यटकांचा कास प्रवास हा कितपत सुरक्षित आहे? ही चिंतेची बाब आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर यवतेश्‍वर घाटात रस्ता खचल्याने संरक्षक कठडा कोसळला होता. त्यावेळी सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर याठिकाणी बॅरिकेटस्‌ लावण्यात आले होते, ते आजही तसेच आहेत. परंतु, या ठिकाणी पुन्हा संरक्षक कठडे बांधण्याचे धारिष्ट्य बांधकाम विभागाने दाखवलेले नसल्याने संबंधित विभागाने “बॅरिकेटस्‌वरच रामराम’ केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सप्टेबर महिन्यात कास पठावरीलर फुलांना बहर येतो. या कालावधीत जगभरातील पर्यटक कासला भेटी देत असतात. कास या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी पर्यटकांना यवतेश्‍वर घाटातूनच पुढे जावे लागते. गेल्या काही दिवसांपूर्वी या घाटातील कास मार्गावरील रस्त्याकडेचा कठडा जमिन खचल्यामुळे खोल दरीत कोसळला. सुदैवाने यात कोणतेही दुर्दैवी घटना घडली नाही. त्यानंतर संबंधित विभागाने थोडाफार भराव टाकून रस्ता पुन्हा सुरु करत याठिकाणी बॅरिकेटस लावले.

जेणेकरुन पर्यटकांसह याठिकाणी जाणाऱ्या स्थानिकांना प्रवास सुरक्षित व्हावा. दरम्यान, या घटनेनंतर काही कालावधीने का होईना पण येथील संरक्षक कठडे पुन्हा बांधणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. आजही याठिकाणी खचलेल्या संरक्षक कठड्याचा भाग बॅरिकेट लावून झाकण्याचा केविलवाना प्रयत्न संबंधित विभागाने केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या कासचा हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याठिकाणी संरक्षक कठडे उभारणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)