संयुक्तराष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात ठोस कृती योजना आखावी- उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांचे प्रतिपादन 
नवी दिल्ली: साऱ्या जगानेच दहशतवादाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी संयुक्तराष्ट्रांनीच ठोस कृती आखली पाहिजे असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी केले आहे. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
भारताचा एक शेजारी देश सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देत असून त्यांच्या तोंडी मात्र शांततेची भाषा असते असा टोलाही त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता लगावला. या परिसंवादात मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. नायडू म्हणाले की दहशतवाद हा मानवतेचा शत्रु आहे. काही जण धर्माच्या नावाने दहशतवाद पसरवत आहेत. पण कोणताच धर्म दहशतवाद शिकवीत नाही. धर्माच्या नावाने होणाऱ्या दहशतवादाचा मोठा फटका भारतालाही बसला आहे असे ते म्हणाले.
दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या देशांच्या बरोबर तुम्ही शांततेची चर्चा करू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले. दहशतवाद रोखणे हे एकट्यादुकट्या देशाचे काम नाही त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असून हे काम संयुक्तराष्ट्रांनी केले पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक ठोस कृती आराखडा तयार केला पाहिजे असे ते म्हणाले. जागतिक शांततेसाठी हे काम महत्वाचे आहे त्यासाठी शक्‍य तितक्‍या लवकर संयुक्तराष्ट्रांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)