संभाजी भिडे सह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या आमदारांवरील खटले मागे !

मुंबई: राज्यातील सत्तेवर असलेल्या फडणवीस सरकारने राजकिय व सामाजिक आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या लोकप्रतिनिधीबरोबरच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह 41 जणांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे गुन्हे मागे घेतल्यासंबधीचे पत्र संबंधित पोलीस जिल्ह्यांचे आयुक्त, जिल्हादंडाधिकारी, सहायक संचाल-अभियोग संचालनालय, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविण्यात आले आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांमार्पैत बंद पुकारणे, घेराव घालणे, मोर्चा काढणे, निदर्शन करणे आदी प्रकारचे आंदोलनाच मार्ग पुकारले जातात. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतात व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटले भरण्यात येतात. सदर खटले वर्षांनुवर्षे चालू राहतात. शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर 1 नोव्हेंबर 2014 पूर्वी दाखल असलेले व प्रलंबित असलेले राजकिय, सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनखुळे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, दिपक केसरकर यांचा यामध्ये समावेश आहे.
या समितीची आतापर्यंत सात बैठका झाल्या. 10 सप्टेंबर 2018 रोजी शेवटची बैठक झाली. या बैठकीत सामाजिक व राजकिय आंदोलनात सहभागी झालेल्या राजकिय पक्षांच्या आमदाराबरोबरच सामाजिक आंदोलनातही सहभागी झालेल्या व्यकंतिचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी विैंवा वैयक्तीक आंदोनलादरम्यान जीवीत हानी झालेली नसावी, व अशा घटनेमध्ये खाजगी व सार्वजनिक माज मत्तेची 5 लाखांपेक्षा अधिक वित्त हानी झालेली नाही अशा बाबींही विचारात घेण्यात आल्या.
गुन्हे मागे घेण्यात आलेल्यांमध्ये स्वाभीमान शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी, शिवेसेनेच्या आमदार निलम गोछहे, आमदार अजय चौधरी, भाजपाचे आमदार संजय (बाळा) भेगडे, प्रशांत ठावूैर, अनिल राठोड, आशिष देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार किरण पावसकर यांच्याबरोबरच संभाजी प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा समावेश आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)