संभाजी भिडे यांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करा -संभाजी ब्रिगेड

मुंबई: सरकारला संभाजी भिडे यांना अटक करता येत नसेल तर त्यांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक व्हावी, या मागणीसाठी सोमवारी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून विविध संघटनांचे कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी सरकार संभाजी भिडे यांना अटक का करत नाही, असा सवाल विचारला. भिडे गुरूजी यांना अटक न होण्याच्या षडयंत्रात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांना अटक होत नाही तर देवेंद्र फडणवीस यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)