संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली

कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन पुणे पोलिसांचा निर्णय

पुणे – श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज (बुधवार दि. 28 मार्च) पुणे शहरात काढण्यात येणाऱ्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकराली आहे. परवानगी नाकारावी, असे एक निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे पुणे शहर पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना मंगळवारी देण्यात आले होते.

संभाजी भिडे यांना अटक करावी यामागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 200 संघटनांनी एकत्र येत मुंबईत एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या मोचार्नंतर मुख्यमंत्र्यांना आठ दिवसांत संभाजी भिंडे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज महामोर्चाचे आयोजन केले होते. शनिवारवाडा येथून सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा सुरू होणार होता. त्यानंतर

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता होणार होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने कार्यकर्ते सकाळी 10 वाजता ओंकारेश्‍वर मंदिराजवळ जमून कसबा गणपती व लाल महाल येथे चालत जाणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)