संभाजी भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ कोल्हापुरात हिंदुत्त्ववादी संघटनांचा विराट मोर्चा

      आंबेडकर, मेवाणी, खलीद, कोळसे-पाटील यांना अटक करण्याची मागणी 

कोल्हापूर – शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भीमा-कोरेगांव दंगल घडविल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करण्यात आली.

मोर्चाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन व ध्येय मंत्राने साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिंदु चौक येथून झाली. मोर्चाच्या अग्रभागी भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा बिंदु चौक -आईसाहेब महाराज पुतळा- लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर- व्हीनस कॉर्नर – स्टेशनरोड- असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता प्रेरणा मंत्राने झाली.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘नक्षलवादी हे देशाचे मित्र आहेत’असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी संविधानाच्या ‘ नागरीक मुलभूत कर्तव्याचा ’ अनादर केला आहे. याशिवाय सीआरपीएफ जवानांचाही घोर अपमान केला आहे. यासह प्रक्षोभ वक्तव्य करणाऱ्या उमर खलीद यांना एल्गार परिषदेत आणून वातावरणात आणखी तेढ निर्माण केला.

संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भीमा-कोरेगाव दंगलीत दगड फेकीचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेला अटक करुन त्यांची नार्को टेस्ट घ्यावी. ३ जानेवारी २०१८ च्या दंगलीवेळी राहूल फटांगळे या युवकाची हत्या झाली. त्याच्या हत्येप्रकरणी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सहकाऱ्यांना दोषी ठरवून हत्येचा गुन्हा नोंद करावा. जिग्नेश मेवाणी, उमर खलीद, बी.जी.कोळसे पाटील,आदींच्यावर महाराष्ट्र बंदच्या दरम्यान झालेल्या अर्थिक, सार्वजनिक, खासगी मालमत्तेच्या नुकसानीला जबाबदार धरुन नुकसान भरपाई वसुल करावी व गुन्हे दाखल करावेत. कोल्हापूरसह इतर ठिकाणी पोलीस-पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकानाही अटक करावी. या सर्व मागण्यांचा विचार करुन कारवाई न झाल्यास कोल्हापूर जिल्हा बंद पुकारण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
42 :thumbsup:
6 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)