संभाजी निलंगेकरांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा!

“स्टेप बाय स्टेप’ संचालक हत्याप्रकरण…


राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी


चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमा

मुंबई – लातूर येथील “स्टेप बाय स्टेप’ या क्‍लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीसोबत निलंगेकरांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतरही मी त्याला ओळखत नसल्याचा दावा करणारे कामगार मंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल केली असून अशा मंत्र्याचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लातुरमध्ये शैक्षणिक क्‍लासेस चालवणारे अविनाश चव्हाण यांची रविवारी गोळया झाडून हत्या झाली. त्या हत्येमध्ये संभाजी निलंगेकर यांच्या बॉडीगार्डला अटक करण्यात आली. त्यावर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत संभाजी निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर तोफ डागली. राज्यात मंत्र्यांच्या माध्यमातून गुंडाच्या टोळया काम करत असून मुख्यमंत्र्यांनी जंगलराज निर्माण केल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला.

निलंगेकर यांचा बॉडीगार्ड करणसिंह याला अटक झाल्यावर मंत्र्यांनी मी त्याला ओळखत नाही असे सांगितले. परंतु त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तो माझा बॉडीगार्ड नाही आणि तो पक्षातही नाही असे स्पष्टीकरण दिले. मात्र मंत्री असे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. करणसिंह याचे निलंगेकरांसोबत असलेले फोटोही मलिक यांनी मिडियासमोर ठेवले.

करणसिंह याच्याकडे कार्बाईन कशी आली, कुठुन आली, असे सवाल करत मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ही कार्बाईन घेऊन त्याने फोटो काढल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)