संभाजीनगरमधील बस टर्मिनलवरुन नगरसेवकांत जुंपली

पिंपरी – चिंचवड, संभाजीनगर येथील बस टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी संरक्षक भींत पाडली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर मंगला कदम यांनीच प्रभागात अतिक्रमणे केली असून, सर्व रितसर परवानग्या घेऊनच या भूखंडावर कार्यक्रम आयोजित केला असल्याचा दावा नगरसेवक तुषार हिंगे यांनी केला आहे. पुराव्या दाखल महापालिकेच्या परवानगीची प्रत सादर केली. केवळ राजकीय आकसापोटी कदम यांच्याकडून बिनबुडाचे आरोप होत असल्याचे हिंगे म्हणाले.

संभाजीनगर येथील एमआयडीसी जी ब्लॉक येथील एचडीएफसी कॉलनीसमोर महापालिकेचा भूखंड आहे. बस टर्मिनलसाठी हा भूखंड आरक्षित आहे. हा भूखंड बळकाविण्यासाठी भाजप नगरसेवक तुषार हिंगे फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुपेकर यांनी संगनमताने भूंखडाची संरक्षक भींत पाडून, जेसीबी व पोकलॅनच्या सहाय्याने व जागेचे सपाटीकरण केले आहे. बस टर्मिनलचा भूखंड महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी एमआयडीसीकडे कोट्यवधी रुपयांचे विकसन शुल्क भरले आहे. भूखंडावरील अतिक्रमण आणि खासगी वापरापासून संरक्षण करण्याकरिता लाखो रुपये खर्च करुन सीमाभिंत बांधण्यात आली आहे. त्यावर लोखंडी ग्रील टाकून कपाऊंड करण्यात आले होते. परंतु, भाजप नगरसेवक हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुपेकर यांनी विनापरवाना संरक्षण भिंत तोडून भुखंड बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोघांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी आरोपांचे खंडन केले आहे. आपण “अ’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीसाठी रितसर परवानगी घेतली आहे. याकरिता 6 हजार, 540 रुपये शुल्क भरुन रितसर परवानगी घेऊनच फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. त्याठिकाणी संरक्षण भींत असल्याची बाब मला तरी माहिती नाही. संरक्षण भींत तसेच जेसीबी व पोकलॅनचा वापर केल्याचे पुरावे कदम यांनी सादर करावेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

संभाजीनगर प्रभागाचे नेतृत्व करत असताना, याप्रभागात अनेक ठिकाणी अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही सर्व अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तत्काळ काढून टाकण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. याशिवाय स्थानिक नगरसेवक या नात्यानेच मी याठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रशासकीय परवानग्यांशिवाय अन्य कोणाच्याही परवानगीची या कार्यक्रमांना गरज नाही.
– तुषार हिंगे,
नगरसेवक, भाजप.

1994 पासून प्रलंबित प्रश्‍न
याठिकाणी बस टर्मिनल आरक्षण टाकल्यानंतर ही जागा ताब्यात मिळविण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीला कोट्यवधी रुपये अदा केले आहेत. याठिकाणी प्रभाग कार्यालय, नाट्यगृह अशी बहुद्देशीय इमारत प्रस्तावित आहे. त्याकरिता डिझाईन व इस्टीमेट तयार करण्याचे काम सुरु आहे. त्याकरिता आर्किटेक्‍ट व कन्सल्टंटची देखील नियुक्‍ती करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)