संबंध कटु असूनही भाजपा सोडणार नाही : सिन्हा 

सीबीआयमधील घडामोडींबाबत विरोधी पक्षाशी पूर्णपणे सहमत 

नवी दिल्ली: भाजपबरोबरचे संबंध कटु असूनही आपण पक्ष सोडणार नसल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. आज जर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जिवंत असत्या तर मी कॉंग्रेसमध्ये असतो असे सिन्हा यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पक्षाने हवे असेल तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावा असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये दोन वेळा मंत्रिपद सांभाळणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकलात असे विचारण्यात आले. यावर त्यांनी नरेंद्र मोदींची ऊर्जा आपल्याला प्रेरणा देते असे सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, आपल्या ग्रंथांमध्ये रावणासहित सर्वांकडून शिकलं पाहिजे अशी शिकवण देण्यात आली आहे.
भाजपासोबत असणाऱ्या संबंधांविषयी यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी पक्षासोबत आपले संबंध थोडे कटु असल्याची कबुली दिली.

शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकारचा उल्लेख केला. अटलजींच्या कार्यकाळात आपण लोकशाही कार्यकाळाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारशी तुलना करत सध्या हुकूमशाही असल्याचे म्हटले. कोणतीही माहिती न देता नोटाबंदीसारखे निर्णय घेतले जातात. रात्री हे निर्णय जाहीर केले जातात असं ते बोलले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.

सीबीआयवरून सुरू असलेल्या गदारोळावरही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य करत आपण विरोधी पक्षांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. सरकारने तपास यंत्रणेला संपवलं असल्याचं त्यांनी म्हटलं. हे सीबीआय अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून, राफेलसारखं काहीतरी झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते बोलले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)