संप काळात संगमनेर आगाराचे 7 लाखांचे नुकसान

आगारप्रमुख सौंदाणे यांची माहिती
संगमनेर – सलग दोन दिवस झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संगमनेर आगारातील 800 फेऱ्या रद्द झाल्या. आगाराचे सुमारे 7 लाखांचे नुकसान झाले अशी माहिती आगार प्रमुख म. भै. सौंदाणे यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गालगत संगमनेर हे महत्त्वाचे शहर आहे. अधिक महिन्यामुळे तसेच शनिवार, रविवारची सुट्टी लक्षात घेऊन अनेक नागरिक तीर्थक्षेत्री जाण्यासाठी बसस्थानकात गर्दी केली होती. एसटी कामगारांनी अचानक संप पुकारल्याने त्यांचे हाल झाले. त्यातच प्रवाशांची जीवनदायीनी असलेल्या लालपरीची लांब पल्ल्याची वाहतूक संपूर्णपणे कोलमडल्यामुळे त्यांचे अर्थकारण बिघडले. मात्र, जास्त पैसे देऊन प्रवाशांना यावेळी खासगी चारचाकी वाहनांमधून प्रवास करावा लागला. त्यामुळे मागील संपात प्रवाश्‍यांची सहानुभूती मिळवलेल्या कर्मचाऱ्यांनी मात्र या संपात प्रवाश्‍याची सहानुभूती संपूर्णपणे गमावल्याची चित्र आहे.
या संपात 264 चालक वाहक सह अनेक इतर कामगार संपात सहभागी झाल्याने 800 फेऱ्या रद्द झाल्या. संपातील दोन दिवस एकही फेरी झाली नसल्याने ग्रामीण भागातील दळण वळण ठप्प झाले होते. त्यामुळे आगारचे किमान सात लाखाचे नुकसान झाले. दोन दिवस आंदोलनात अधिकारी 24 तास बस डेपोमध्ये मुक्कामी होते, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)