संपूर्ण ‘सतर्कता’ मिळवा 

महान व्याख्याते जॉन कबाच जिन यांच्या मते संपूर्ण सतर्कता म्हणजे हेतूपुरस्सरपणे सध्याच्या क्षणावर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता लक्ष देणे होय. मग सतर्कता म्हणजे काय? आणि आपण ती कशी साध्य करायची? सतर्कता म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाणीवपूर्वक त्या क्षणात जगणे होय. ही जागरूकतेची अशी स्थिती आहे जिथे तुम्ही सध्याच्या कृत्यांना तुमच्या आसपासच्या वातावरणात घडणाऱ्या तत्सम गोष्टींसोबत जुळवून पाहता. 
आपल्या वेगवान आयुष्यात आपण वेळापत्रकाने बांधलेले असतो. एखाद्या ठिकाणी पोहोचण्याची, एखादे काम पूर्ण करण्याची, स्वतःचे आरोग्य आणि मनोरंजनात सहभागी होण्याची वेळ. आपण आपल्या प्रियजनांसोबत छान वेळ घालवण्यासाठीही वेळापत्रक ठरवलेले असते. आपण अजाणतेपणे ऑटोपायलट मोडमध्ये शिरलेले आहोत. संशोधनातून हे दिसून आले आहे की, एक सर्वसामान्य व्यक्ती ही 47 टक्के वेळा ऑटोपायलट झोनमध्ये असते. सतर्कता म्हणजे या ऑटोपायलट झोनमधून बाहेर येणे आणि जागरूकतेने तुमच्या रोजच्या कामांना अर्थपूर्णता आणणे होय. 
नैराश्‍य, ताण आणि चिंता या गोष्टींच्या वाढत्या घटनांमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. विद्वान लाओ त्सूने 2500 वर्षांपूर्वी सांगितले होते की,तुम्ही नैराश्‍यग्रस्त असाल तर तुम्ही भूतकाळात जगत आहात. तुम्ही चिंतेत असाल तर तुम्ही भविष्यात जगत आहात. तुम्ही मनःशांतीत जगत असाल तर तुम्ही वर्तमानकाळात जगत आहात. त्यामुळे सतर्कतेप्रति पाच सोपी पावले उचलून आपण वर्तमानकाळात शांतता शोधणे आवश्‍यक आहे. 
सतर्क राहण्याचा निर्णय घ्या 
स्वतःला ऑटोपायलट मोडमधून बाहेर आणा. तुमच्या रोजच्या अगदी छोट्या छोट्या कामातही सतर्कता आणा. अगदी एक कप कॉफी पिण्यासारखी गोष्ट असली तरी त्यासाठी थोडा वेळ द्या आणि ती घटना आनंददायी बनवा. कॉफीच्या सुगंधाचा आनंद घ्या, चवीकडे लक्ष द्या आणि घोटाघोटाने तो ताजेपणा तुम्हाला कसा आनंदी बनवतो हे पाहा. वर्तमानातील क्षणाबाबात जागरूक झाल्याने आपण विविध काळातील चिंता दूर करतो आणि सतर्कतेप्रति पहिला टप्पा पार करतो. 
सतर्कतेसाठी ध्यानधारणा 
सतर्कतेची अनौपचारिक पद्धत रोजच्या कामांभोवती फिरणारी असली तरी औपचारिक पद्धत ध्यानधारणेभोवती फिरते. तुमचे मन आणि शरीर यांना ध्यानधारणेद्वारे सकारात्मक ऊर्जा द्या. ध्यानधारणेमुळे तुम्ही प्रतिक्रियाहीन वातावरणात जाता आणि तुम्हाला फक्त वर्तमानकाळाबाबत जागरूक होण्यासाठी मदत मिळते. ध्यानधारणेमुळे मन शांत होते आणि आपल्या शरीरातील अंतर्गत संगीत आणि गतीबाबत आपण जागरूक होतो. आपण अगदी सुरुवातीला साध्या हलक्‍या ध्यानधारणेपासून सुरुवात करू शकतो. 
योगासनांसोबत सतर्कतेचा अनुभव घ्या 
आपण सर्वांनी अशा क्षणांचा अनुभव घेतला आहे जिथे आपण एखाद्या अनुभवामध्ये पूर्णपणे बुडून जातो. तुम्हाला तेव्हा ते कळत नाही; परंतु त्या टप्प्यात असण्याची स्थिती म्हणजे सतर्कतेची स्थिती होय. म्हणजे तुम्ही पोहोत असता तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या श्‍वासावर आणि शरीराच्या सहज व वेगवान हालचालींवर असते. शांत आणि एकाग्र मन तसेच पाण्याची शांतता आणि नितळता तसेच शरीराच्या हालचालींबाबत जागरूकता ही सतर्कता आहे. सुमारे 25000 झोर्बियन्सनी योगासने करत असता अशाच प्रकारची सतर्कता साध्य झाल्याचे सामायिक मत व्यक्त केले आहे. योगासने म्हणजे मन, शरीर, आत्मा आणि वातावरण यांचे एकत्रीकरण आहे. आसनांवर एकाग्रित श्‍वासोश्‍वास आणि मनःशांती देणारी ध्यानधारणा यांच्या माध्यमातून सतर्कता आणि ऊर्जेच्या सकारात्मक प्रवाहाचा अनुभव घेण्याची ही अचूक पद्धत आहे.
 
सकारात्मक विधाने 
शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. त्यांचा नीट वापर करा. सकारात्मक विधानांद्वारे सकारात्मक आणि अंतर्गत शक्तीचा अनुभव घ्या. आपल्या शब्दांची योग्य निवड करणे आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींबाबत कृतज्ञता व्यक्त केल्याने विचारांत सुस्पष्टता येते आणि आनंदाची भावना निर्माण होते.
 
वातावरणाचा आनंद घ्या 
तुमच्या आवडत्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी थोडा वेळ घ्या. बाहेर जा आणि निसर्गाचा आनंद घ्या. मग तुमच्या बाजूच्या पार्कमध्ये चालणे असो किंवा झाडांनी व्यापलेला रस्ता असो. तुमच्या आजूबाजूचे विविध आवाज आणि वासांकडे लक्ष द्या. शहरे मुख्यत्वे दिसण्यास आकर्षक नसतात परंतु तुम्हाला आनंद देणारी ठिकाणे शोधा. मग वातावरणाचा आनंद घेणारा कुत्रा असेल, कुंपणावर एका रांगेत बसलेले पक्षी असतील किंवा आजूबाजूला सायकलवर फिरणारी लहान मुले असतील. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा अनुभव आणि आनंद घ्या. छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या आणि तुमच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा, तुमच्यासोबत अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या. 
थोडक्‍यात सांगायचे तर खोल श्वास घ्या आणि तुमच्या प्रत्येक कार्यातून सर्वोत्तम मिळवण्यासाठी आणि संपूर्ण सतर्कता साध्य करण्यासाठी त्यात मनापासून सहभागी व्हा. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)