संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

शुक्रवारी होणारा पुरवठा उशिरा आणि कमी दाबाने

पुणे – पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (दि.30 ऑगस्ट) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. 31) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारारस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42-46, कोंढवा खुर्द, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवाबुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी आणि परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणीचौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्थानक परिसर, मुळारस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूररस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)