संपामुळे जनजीवन विस्कळीत…

शहरात सामसूम 
पुणे – ओस रस्ते, दुचाकींची तुरळक वाहतूक, चाकरमान्यांसह पथारी आणि अन्य व्यावसायिकांनी घेतलेला महाराष्ट्र बंदमध्ये घेतलेल्या सहभागामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. आंदोलकांनी वाहने रस्त्याच्या सुरुवातीला उभ्या करुन रस्ते अडविल्याने सर्व रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती.

शासकीय कार्यालयांमध्येही शुकशुकाट असल्याने आणि नागरिकांनाही याची माहिती असल्याने येथील कामकाज ठप्प होते. मध्यवस्तीसह उपनगरांमध्येही हीच परिस्थिती होती. विशेष म्हणजे या बंदमध्ये पेट्रोलपंप चालकांनीही सहभाग घेतल्याने वाहनचालकांनाही फटका बसला. सायंकाळी पाचनंतर ही परिस्थिती काहीसी पूर्वपदावर आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये या बंदचा परिणाम जाणवू लागला, सर्व व्यावसायिकांनी उस्फूर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवले होते. खाद्यपदार्थांच्या गाड्या, चहाच्या गाड्‌या आणि स्टॉल, पान दुकाने, हॉटेल्स यासह अन्य व्यवसायिक या बंदमध्ये सहभागी झाले होते. नेहमीच वर्दळीचा असलेला लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, नगर रस्ता, जुना पुणे मुंबई रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, विमानतळ रस्ता, सातारा रस्ता आदी ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर टायर ठेऊन आणि दुचाक्‍या तसेच चारचाकी वाहने आडवी लावून रस्ते बंद केले होते.

आंदोलकांच्या वतीने वडगांवशेरी, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगांव, चंदननगर, खराडी यासह लक्ष्मी रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्त्यासह शहराच्या सर्वच भागात आंदोलकांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आल्या होत्या. पेट्रोलपंप चालकांनी आज सकाळपासूनच त्यांचे व्यवहार बंद ठेवले होते, त्यामुळे पेट्रोल संपलेल्या वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)