संपादित जमिनींचा मोबदला त्वरित द्यावा

शिवाजीनगर ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

शिरवळ – शिवाजीनगर, ता. खंडाळा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी संपादित केलेल्या संमतीधारक शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी होऊन त्वरीत मोबदला देण्यात यावा. अन्यथा, दि. 23 रोजी सुभाषचंद्र बोस जयंतीदिवशी तहसीलच्या आवारात सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 28 एप्रिल 2010 मध्ये शिवाजीनगरमधील 408 हेक्‍टर 40 आर क्षेत्र औद्योगिक वसाहत क्षेत्रासाठी संपादनात आलेले दि. 17 एप्रिल 2010 पासून हस्तातरणांस बंद असा शेरा मारून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी जमिनींचे रिझर्वेशेन केले आहे.

आतापर्यंत शासनाकडून टप्पा क्र. तीन संपादित करून मोबदला घेतलेल्या जमिनीचे क्षेत्र 43 हे 80 आर, राजपत्रित झालेले क्षेत्र 24 हे. 10 आर, मोजणी संमती क्षेत्र 26 हेक्‍टर 89 आर, संपुर्ण गट समिती क्षेत्र 24 हेक्‍टर 35 आर, सातबाराचे सत्तर टक्के क्षेत्र 81 हेक्‍टर 15 आर, सामाईक क्षेत्र साठ टक्के या प्रकारे शेतकऱ्यांनी जमीन संपादनासाठी संमत्ती दिली आहे.

शासनाने 43 हेक्‍टर 08 आर क्षेत्राचे संपादनाच्या मोबदल्याची रक्कम 2016 मध्ये गुंतवणूकदारांची अदा केली आहे. दि. 25 मे 2016 रोजी 24 हेक्‍टर 10 आर क्षेत्राची जमीन संपादनाचे राजपत्र प्रसिध्द केले असून बाहेरून आलेल्या गुंतवणूकदारांची 16 हेक्‍टर क्षेत्राची मोबदल्याची रक्कम अदा केली आहे. परंतु, त्याच राजपत्रात आसले गावातील स्थानिक शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्र 0.8 हेक्‍टर 29 आर क्षेत्राची जमिनीच्या मोबदल्याची रक्कम अदा केलेली नाही.

दि. 26 मार्च 2017 रोजी 26 हेक्‍टर 89 आर क्षेत्राची मोजणीची नोटीस आली. त्यानंतर दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी याच क्षेत्राची मोजणी नोटीस प्रसिध्द झाली. या क्षेत्राची मोजणी आम्ही आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर दि. 26 फेब्रुवारी 2018 रोजी झाली. परंतु मोजणीचा आजअखेर कोणताही अहवाल आम्हाला पाहावयास मिळाला नाही. 2010 ते 2018 गेली आठ वर्षे आमची संमत्ती असताना सुध्दा आम्हाला जमिनीचा संपादनासाठी कोणचाही मोबदला मिळाला नाही.

तरी टप्पा क्रमांक तीन जमिनीचा मोबदला दि. 21 जानेवारी 2019 च्या आत मोबदला मिळावा आणि समंत्तीधारक सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी होऊन मोबदला मिळावा. जे रात्रपत्रित होऊन संपादनाचा मोबदला देणे शिल्लक असलेले क्षेत्र 08 हेक्‍टर क्षेत्रही द्यावे. अन्यथा, दि. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी तहसिल कार्यालय आवारात सामुदायिक आत्मदहन करणार आहोत, असा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)