संपर्क संघटकपदी विजया शिंदे यांची निवड

राजगुरूनगर – पुणे जिल्हा शिवसेना महिला संघटक विजया शिंदे यांची शिरूर लोकसभा मतदार संघाच्यासह संपर्क संघटकपदी निवड करण्यात आली. विजया शिंदे या गेली 20 पेक्षा अधिक वर्षांपासून शिवसेनेत पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत. शिवसेनेत महिला संघटित करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अनेकांची विस्कळीत घरे जोडण्याचे प्रभावी काम केले आहे. राजगुरूनगर सहकारी बॅंकेवर त्या सलग चार वेळा निवडून आल्या आहेत बॅंकेच्या माध्यमातून अनेक युवकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी बॅंकेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपद त्यांनी काही वर्षांपूर्वी भूषवले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्‍यासह जिल्ह्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनाच सक्रिय सहभाग असतो. चाकणचे कांदा आंदोलन, डाऊ केमिकल विरोधात आंदोलन, महागाई विरोधात आंदोलन आदी आंदोलनात सभाग घेऊन त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांची अग्रेसर भूमिका असते. त्यांचा कामाची दखल घेवून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या सह संपर्कसंघटकपदी निवड करण्यात आली आहे. विजया शिंदे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे, रवींद्र मिर्लेकर, खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेत्या मीना कांबळी यांनी टाकलेला विश्वास काम करून सार्थ करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)