संधी शोधण्यापेक्षा ती तयार करा : डॉ. अरूण अडसूळ

आंबी : पदवीदान सोहळ्याप्रसंग (डावीकडून) विलास नितनवरे, डॉ. अरूण अडसूळ, बी. एस कोटकर, डॉ. अभय पवार, डॉ. प्रकाश पाटील तसेच विभाग प्रमुख.
  • डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रीकी विद्यालयात पदवीदान सोहळा

तळेगाव दाभाडे,  (वार्ताहर) – जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी ध्येय बाळगा. संधी शोधण्यापेक्षा ती तयार करा. कुठल्याही परिस्थीतीत मागे न हटता निर्णय घ्या. आयुष्य हे संघर्षमय आहे. पदवीचे शिक्षण घेत असताना तुमच्या आवडी निवडी ओळखा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांनी व्यक्त केले.

आंबी (ता. मावळ) येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आणि डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींगचा पदावी ग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अडसुळ बोलत होते. या वेळी विश्‍वस्त बी. डी. कोटकर, जनसंपर्क अधिकारी सुशांत पाटील, प्राचार्य डॉ. अभय पवार, डॉ. विलास नितनवरे, उपप्राचार्य प्रकाश पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

डॉ. अडसूळ पुढे म्हणाले की, विद्यार्थी दशेत भविष्याची दिशा मिळणे गरजेचे आहे. ही दिशा मिळाल्यास पुढचा प्रवास सोपा जातो आणि इच्छित ध्येयापर्यंत पोहचता येते. त्यामुळे ही दिशा तुमच्या महाविद्यालयीन जीवनातच निश्‍चित करा.
महाविद्यालयाच्या विविध शाखेतील 440 विद्यार्थाना अडसूळ यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्य परीक्षा निरीक्षक अधिकारी प्रा. संतोष बारी आणि प्रा. मोरेश मुखेडकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाच्या आवारात दिक्षांत संचलन करण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, संकुल संचालक व्ही. रमेश यांचे मार्गदर्शन मिळाले. व्यवस्थापक बी. एस. गायकवाड आणि निबंधक अशोक पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा. वृषाली देसले यांनी केले. प्रा. प्रभुदेव यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)